इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट… जळगावात भयंकर घडलं

जळगावमध्ये प्रेमासाठी सीमा ओलांडणाऱ्या बांगलादेशी तरुणीचे प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि (Love) त्यानंतर प्रियकराशी लग्न करण्यासाठी एका तरुणीने थेट बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील 20 वर्षीय Konika Rani Shyamlachandra Roy हिची सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगावमधील सुवर्ण कारागीर Chinmay Jagannath Wala याच्याशी ओळख झाली होती. काही महिन्यांतच दोघांमध्ये मैत्री वाढली आणि नंतर या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले.

प्रियकरासोबत संसार थाटण्याच्या उद्देशाने तरुणीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता भारताची सीमा ओलांडली. (Love) त्यानंतर ती थेट Jalgaon येथे आली आणि जोशी पेठ परिसरात राहत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान तरुणीकडे वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत ती चिन्मय वालासोबत राहत असल्याचेही समोर आले.

या प्रकरणानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात बेकायदेशीर प्रवेश आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Love) या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून सोशल मीडियावरून वाढणाऱ्या संबंधांबाबतही नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?