श्रेयस अय्यर कर्णधार होताच खेळाडूंना संघात मिळाली संधी?

भारतीय टी-20 (T20) संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरयांच्याकडे आल्यानंतर पंजाब किंग्स संघातील खेळाडूंना मोठी संधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाहीर करण्यात (Shreyas Iyer) आलेल्या भारतीय संघात पंजाब किंग्सच्या आणखी दोन खेळाडूंची निवड झाली असून, यापूर्वीही त्याच संघातील एका खेळाडूला संधी देण्यात आली होती.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पंजाबच्या दोन खेळाडूंना संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे. या संघात पंजाब किंग्सचे प्रभसिमरन सिंह आणि यश ठाकूर यांना स्थान मिळाले आहे. प्रभसिमरन सिंहची निवड देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर अपेक्षित मानली जात होती. मात्र, यश ठाकूरच्या निवडीने क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Shreyas Iyer) अनेक क्रिकेटप्रेमींनी आणि जाणकारांनी यश ठाकूरच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजांचे इतरही मजबूत पर्याय उपलब्ध असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. साकिब हुसेन, रासिक डार आणि कार्तिक त्यागीयांनी आयपीएल (IPL) 2026 स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली असूनही त्यांना संधी मिळाली नाही, तर यश ठाकूरची निवड करण्यात आल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

यापूर्वीही पंजाबच्या खेळाडूला मिळाली होती संधी पंजाब किंग्समधून भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंची संख्या केवळ दोनवर मर्यादित नाही. याआधी सूर्यांश शेडगे यालाही भारतीय संघात संधी देण्यात आली होती. (Shreyas Iyer) त्यामुळे पंजाब किंग्सच्या एकूण तीन खेळाडूंना अलीकडच्या काळात टीम इंडियात स्थान मिळाले आहे.सूर्यांश शेडगेचा भारतीय संघात समावेश रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून करण्यात आला होता. नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्यांच्या जागी शेडगेला संघात संधी देण्यात आली होती. आता प्रभसिमरन सिंह आणि यश ठाकूर यांच्या निवडीमुळे पंजाब किंग्समधील तीन खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने या फ्रँचायझीचीही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय?

शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो सावधान? तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?