गांधीनगर : अहमदाबादहून विमानतळाजवळ घडलेल्या एअर इंडिया AI 171 विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सु्न्न झाला आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून(plane crashed) लंडनसाठी उड्डाण घेतलेले हे विमान एका मिनिटाच्या आत कोसळले. या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचा करुण अंत झाला आहे. ज्यामध्ये २४१ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचाही समावेश आहे.
उर्वरित मृतांमध्ये हॉस्टेलमधील लोकांचा समावेश आहे. विमान अपघातात(plane crashed) गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे देखील निधन झाले आहे. यातच हॉस्टेल परिसरातील लोकही या अपघाताला बळी पडले आहेत. यात एका १५ वर्षीय चहावाल्याचाही समावेश आहे.
एअर इंडियाचे हे विमान ज्या बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळले त्याच कॉलेजच्या आवाराच्या बाहेर आपल्या आईसोबत चहाचे दुकान चालवणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव याच्यावरही मृत्यू ओढावला आहे. तर त्याची आई रेखा यादव या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे. सध्या रेखा यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी एअर इंडिया १.४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि विमानाचे काही तुकडे थेट बी. जे. मेडिकल हॉस्टेलच्या परिसरात येऊन पडले. येथेच आकाश आणि त्याची आई नेहमीप्रमाणे आपल्या चहाचे दुकानात काम करत होते आणि विमानाचे तुकडे त्यांच्यावर काळ बनून कोसळले. यात आकाश (१५ वर्षे) याचा करुण अंत झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.
हेही वाचा :