सोन्याचे भाव वाढणार असल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही सोन्याच्या दरात मोठी उसळी दिसली. आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 13 हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती सराफा बाजारातून आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना एक वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर देशातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अजूनही लोक सोनं खरेदी करत आहेत. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अचानक सोन्याच्या भावात उसळी आली आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात प्रचंड वाढ होणार असल्याचं सराफा बाजारातील व्यापारी सांगत आहे. (price of gold) म्हणजेच सोनं आणखी महाग होणार आहे. आजपासूनही सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. ही झळ प्रचंड मोठी असेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सोन्याच्या दरांवर भाष्य केलं आहे. सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने आजपासून सोनं प्रति 10 ग्रॅम 13 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे भाव वाढणार आहेत. सोने- चांदीवरील आयातशुल्कात मोठी वाढ झाली आहे. (price of gold) त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होणार आहे. आज बाजारपेठेत सोनं 12 ते 13 लाख प्रती किलोने महागणार आहे, असं राजेश रोकडे यांनी सांगितलं. आज जर सोन्याचे भाव एवढ्या प्रमाणात वााढणार असतील तर येणाऱ्या काळात सोन्याचा आकडा हा झटका देणाराच ठरेल, असं सांगितलं जात आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला देशातली प्रमुख व्यापारी उपस्थित होते. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलनं पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सोन्याचं आयात शुल्क 5 टक्क्यांवरुन 10 टक्के झालं आहे, ॲग्रीकल्चर सेस 1 टक्क्यांवरून 5 टक्के झाले आहे, ड्युटी 15 टक्के झाली आहे, सर्व मिळून 18 टक्के कर वाढला आहे. पूर्वी प्रति किलो साडेतेरा लाख रुपये कर लागायचा. आता तो 27 लाख रुपये कर भरावा लागत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नागपुरात सोन्याच्या दर 1 लाख 61 हजार 509 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 7900 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे. आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे. (price of gold) दर वाढल्याने काही ज्वेलर्सकडे ग्राहकांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून दुसरीकडे दुकानातील ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.
हेही वाचा
चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू
महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात