सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात तूप(benefits) मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीराची पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचा देखील सुंदर राहील. जाणून घ्या तुपाचे पाणी पिण्याचे फायदे.

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे छोटे मोठे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप इत्यादी (benefits) अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गजरेचे आहे. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात. त्यामुळे दीर्घकाळ हेल्दी आणि मजबूत राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीच्या सेवनाशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटत नाही. तर काहींना दिवसभरात अनेक वेळा चहा कॉफी प्यायची सवय असते. पण यामुळे पचनाच्या गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते.

सकाळी उठल्यानंतर चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. कोमट पाणी शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. उपाशी पोटी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय आतड्यांमध्ये चिटकून राहिलेल्या विषारी मलामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात गॅस, बद्धकोष्ठता किंवा वारंवार ऍसिडिटीची समस्या वाढते आणि डोकेदुखी, मळमळ, उलट्या इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. चला तर जाणून घेऊया कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे.

कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे:

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी एक ग्लास कोमट पाणी करून त्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हाडे मजबूत राहतात. वाढत्या वयात हाडांसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. कंबर दुखणे, हाडांमधून कटकट आवाज येणे, चालताना किंवा खाली बसताना गुडघ्यांमध्ये वेदना होणे इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. हाडांच्या जॉइंट्समध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी तुपाचे पाणी प्रभावी ठरेल.

वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. डाएट, महागडे सप्लिमेंट्स, गोळ्या औषध इत्यादी पदार्थांचे सेवन करण्याऐवजी कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. महिनाभर कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येईल. तसेच शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी जळून जाण्यास मदत होईल आणि मेटाबॉलिज्म सुधारेल.

तुपामध्ये ओमेगा-3, ओमेगा-9, फॅटी अ‍ॅसिड, विटामिन ए, के, ई, विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. पचनक्रिया बिघडल्यानंतर चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात. हे पिंपल्स किंवा फोड येऊ नये म्हणून कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. यामुळे त्वचेचे सौंदर्य खुलून दिसेल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.

साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. अशावेळी तूप आणि लसूण खावी. तूप आणि लसूण खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. लसूणमध्ये असलेले पोटॅशिअम, गुड फॅट आणि मॅग्नेशिअम शरीराला पोषण देतात. याशिवाय कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास रक्तदाब कायमच नियंत्रणात राहील.

हेही वाचा :

 दुर्लक्ष न करता घ्या काळजी….
Renault Triber ची चावी तुमच्या हातात,
आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,