लग्नाच्या चार वर्षांनंतर अभिनेत्री मौनी रॉयने घटस्फोट घेतला आहे. आता मौनीने या सगळ्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या

‘नागिन’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय हिचा घटस्फोट झाला आहे. तिने पती सूरज नांबियारपासून फारकत घेतली (Mouni Roy) असून लग्नाच्या ४ वर्षांनंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मौनी आता सूरजसोबत राहत नसून दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. आता मौनीने या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मौनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मौनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने माझी सर्व मीडिया कंपनीला विनंती आहे की कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका. आम्हाला आमचा वेळ द्या आणि आमच्या खासगी गोष्टींचा आदर करा असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर मौनीची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सूरजने मौनी रॉयची फसवणूक केली आहे. (Mouni Roy) इतकेच नव्हे तर सूरजने मौनीचे सर्व पैसेही वापरले आहेत. आता या दोघांचा घटस्फोट झाला असून ते एकत्र राहत नाहीत. मौनीने सोशल मीडियावरून सूरजसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. दरम्यान, या दोघांनीही आपल्या घटस्फोटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मौनी रॉय आणि सूरज यांनी २०२२ मध्ये गोव्यात भव्य डेस्टिनेशन वेडिंग केले होते. मल्याळी आणि बंगाली अशा दोन्ही रितीरिवाजांनुसार झालेल्या या लग्नसोहळ्याची प्रचंड चर्चा झाली होता. मौनीची जवळची मैत्रीण अभिनेत्री दिशा पटानी हिनेदेखील सूरज नांबियारला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.सध्या मौनी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे.(Mouni Roy) तिने ‘गोल्ड’, ‘केजीएफ- चॅप्टर १’, ‘रोमिओ अकबर वॉल्टर’, ‘मेड इन चायना’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘ब्लॅकआउट’, ‘वेदा’ आणि ‘द भूतनी’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आगामी काळात तिचे ‘विश्वंभरा’, ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘द वाईव्हज’ हे तीन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.
हेही वाचा
चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू
महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात