राज्य सरकार आज दुपारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, काटकसर आणि इंधन बचतीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेल बचत, सोन्याची खरेदी टाळणे आणि खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या वाहनताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. सुरक्षेची कोणतीही तडजोड न करता ताफ्यातील वाहनसंख्या अर्ध्यावर आणण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून,(meeting) त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक मंत्र्यांनीही बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. यांनी सांगलीतील बैठकीसाठी ई-बाईकचा वापर करत इंधन बचतीचा संदेश दिला. यांनी ईव्ही कारने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. (meeting) यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला, तर यांनी मंत्रालयात पायी जाऊन संदेश दिला.

दरम्यान, प्रशासनातही ऑनलाइन बैठका, प्रवास कमी करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे यांसारख्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. (meeting) काही विभागांनी सरकारी वाहनांचा वापर मर्यादित करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे.राज्य सरकारकडून जाहीर होणाऱ्या निर्णयात सरकारी यंत्रणेतील खर्च कपात, वाहनताफ्यांवर नियंत्रण, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि ऊर्जा बचतीसाठी नवे निर्देश अपेक्षित आहेत. आजच्या बैठकीनंतर यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात

बोरगावात कडकडीत बंद