तुमच्याकडेही पैसे टिकत नाहीत? तुमच्याकडे पैसे आले की लगेच खर्च होतात…(pocket)असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्ही काही वास्तू टीप्सचा वापर केला पाहिजे. कधीकधी, चांगले पैसे कमवूनही काही लोकांकडे ते नसतात. अशा परिस्थितीत, ही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही काही वास्तु टिप्स अवलंबू शकता.वास्तुशास्त्रात पैसे आणि दागिने साठवण्याची योग्य दिशा देखील सांगण्यात आली आहे. म्हणून तुम्ही तुमचे पैशांचं पाकिट किंवा तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवावी. तुम्ही तिजोरीत लाल कापड देखील ठेवू शकता आणि त्यात श्रीयंत्र किंवा चांदीचे नाणं ठेवू शकता. या पद्धतीमुळे तिजोरी कधीही रिकामी होत नाही आणि अनावश्यक खर्च देखील कमी होतो.

वास्तुशास्त्रात, उत्तर दिशेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.(pocket) ही दिशा संपत्तीचं प्रवेशद्वार मानली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजं. यामुळे देवी लक्ष्मीची उपस्थिती तुमच्या घऱात राहते.त्याचप्रमाणे तुमच्या घरात संपत्तीची देवता भगवान कुबेरची मूर्ती किंवा फोटो उत्तरेकडे ठेवावेा. या दिशेने तिजोरी किंवा कपाट देखील ठेवावं. यामुळे संपत्ती आकर्षित होते.

देवी लक्ष्मीची पूजा करणं हा धनप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग मानण्यात येतो.(pocket) त्यामुळे जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर तुम्ही काही वास्तु नियम लक्षात ठेवले पाहिजेत. तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तिला कमळाचं फूल अर्पण करा. असं केल्याने व्यक्तीला धन आणि समृद्धी मिळू लागते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुख्य दरवाजावर दिवा लावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह लावा.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?

एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ