अभिनेता राजपाल यादव काही वर्षांपूर्वीच्या चेक बाऊन्स प्रकरणात (months)आता तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडू न शकल्याने त्याला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. या कठीण काळात आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजण त्याची आर्थिक मदत करत आहेत. यादरम्यान आता राजपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी तो वृंदावनला गेला होता. तिथे त्याने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहे की, कदाचित प्रेमानंद महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाची कुणकुण आधीच लागली होती. म्हणूनच ते त्याला खंबीर राहून आव्हानांचा सामना करण्याचा सल्ला देत होते. या भेटीदरम्यान राजपाल भावूक झाला होता.

या भेटीदरम्यान राजपालने महाराजांसमोर कॉमेडीची एक झलकसुद्धा (months)दाखवली होती. त्यावर ते खळखळून हसले. पुढे त्याला सल्ला देत ते म्हणाले, “आपलं चित्तं देवाशी जोडून ठेवणं हे आयुष्यात सर्वांत गरजेचं आहे. कारण आयुष्यात दु:ख, संकटं येतच असतात. कधीकधी आपल्या जवळच्या लोकांपासून आपण दूर जातो. अशा परिस्थितीत आयुष्य कठीण वाटू लागतं. आर्थिक समस्या, व्यवहार अशा अनेक समस्या आहेत. त्या संकटकाळात फक्त देवच आपल्याला सावरू शकतो. एखादा माणूस तुझ्याशी आज हात मिळवेल, परंतु जेव्हा तू एखाद्या अडचणीत सापडशील, तेव्हा तो बाजूला होईल. संकटकाळात फक्त देवच साथ देतो. त्यामुळे देवाचा नाम जप कर. प्रत्येक संकट, दु:ख यांच्याशी लढायला शिक, हार मानू नकोस.”

“प्रत्येक समस्येदरम्यान धीट राहा, खंबीर राहा. खचू नकोस. देवाचं नामस्मरण (months)करत राहा. देव खूप शक्ती आणि सहयोग देतो. आपण देवाला विसरलोय, म्हणून आज पश्चात्ताप करत आहोत”, असा उपदेश ते राजपालला देत असतात. हे सर्व ऐकताना तो भावूक होतो. पुढच्या वेळी पत्नीला सोबत घेऊन दर्शनाला येणार असल्याचं तो त्यांना सांगतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेमानंद महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाबद्दल दोन महिने आधीच समजलं होतं, असं अनेकांनी म्हटलंय.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?