कलिंगड खाल्ल्यानं मुलाचा मृत्यू, तिघे आजारी एक चूक महागात पडली, डॉक्टरांकडून सतर्कतेचा सल्ला

छत्तीसगड मधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात कलिंगड खाल्ल्यानंतर एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Watermelon) त्याचबरोबर आणखी तीन मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे कलिंगड पुन्हा चर्चेत आले आहे.

मृत मुलाचे नाव अखिलेश असे असून तो आपल्या कुटुंबासह मामाच्या घरी गेला होता. अखिलेश हा दलहा गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी संध्याकाळी घरात आधीपासून कापून ठेवलेले कलिंगड चार मुलांनी खाल्ले होते. काही तासांतच अखिलेशला उलट्या, जुलाब आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर इतर तीन मुलांमध्येही अशीच लक्षणे दिसून आली.

आजारी पडलेल्या मुलांमध्ये श्री धीवर (४), पिंटू धीवर (१२) आणि हितेश धीवर (१३) यांचा समावेश आहे. कुटुंबीयांनी तातडीने सर्व मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अखिलेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सकाळी कापलेले कलिंगड अनेक तास तसेच ठेवण्यात आले होते. उष्ण हवामानात दीर्घकाळ उघडे ठेवलेल्या फळांमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. (Watermelon) त्यामुळे दूषित कलिंगड खाल्ल्याने अन्नविषबाधा झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात अखिलेशचे शवविच्छेदन करण्यात आले असून फॉरेन्सिक तपासासाठी व्हिसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. घरात असलेले दुसरे कलिंगडही अन्न सुरक्षा विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Watermelon) दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांनी उन्हाळ्यात कापलेली फळे दीर्घकाळ उघडी ठेवू नयेत, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि फळे ताजी असल्याची खात्री करूनच सेवन करावे, असा सल्ला दिला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?