वैदिक पंचांगानुसार, आज 8 ऑक्टोबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक(today) ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज करारी आणि कर्तबगार(today) म्हणून लोकांची तुमच्याकडे पाहण्याची प्रतिमा आज तुम्ही सार्थ करून दाखवणार आहात

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज निश्चयाने एखाद्या परिस्थितीला सामोरे जाणार आहात, आर्थिक गुंतवणूक करण्याकडे कल राहील

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसाय सर्व कामे स्वतः न करता योग्य व्यक्तींची मदत घेतली तर कामे लवकर पूर्ण होतील

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. अटीतटीच्या स्पर्धेतून कलाकारांना त्यांचे नेतुण्य सिद्ध करावे लागेल

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तुमच्याकडून सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल, परंतु तरीही सर्वांचे समाधान न झाल्याने निराश व्हाल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांनी आपली प्रकृती सांभाळावी, आपल्या वागणुकीचा इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज काहीतरी नवीन शोधण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न अवश्य करा, नोकरीत कामात असणाऱ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज घरातील खर्च वाढण्याची शक्यता आहे, लांबलेली कामे उरकण्याकरता तुमची घाई असेल, परंतु कोणावरही अति विसंबून राहू नका.

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज पैशाचे व्यवहार करताना काटेकोरपणा दाखवा, स्पर्धकांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणे आवश्यक

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज तरुणांना प्रिय व्यक्तीच्या सहवासाचे आकर्षण वाढेल, उष्णता आणि पित्ताचे विकार बळावतील

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज तब्येतीची काळजी घ्यावी, महिला काही नवीन बेत आखतील, डोके थंड ठेवणे आवश्यक

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज रेंगाळलेल्या कामातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे उद्दिष्ट तुमच्यापुढे ठेवतील.

हेही वाचा :

जगात खळबळ! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा, 3D चा वापर करून शस्त्रे…

कोल्हापूर गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्…

आनंदाची बातमी! MPSC कडून ‘गट क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात