महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट- क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ साठी ९३८ पदांची भरती(Services) जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील जवळपास ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, २७ ऑक्टोबरही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in वर अधिक माहिती पाहू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध केलेल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार , उद्योग निरीक्षकसाठी ९ जागा, तांत्रिक सहायकसाठी ४ जागा, (Services)कर सहायकसाठी ७३ जागा आणि लिपिक टंक लेखनसाठी ८५२ पदांच्या जागा भरणार आहेत.MPSCने स्पष्ट केले आहे की, जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्येमध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, काही अतिरिक्त संवर्गातील पदे ही पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत समाविष्ट केली जाऊ शकतात.

जाहिरात प्रसिद्ध करताना उपलब्ध असलेल्या पदांनुसारच माहिती दिली जाते, मात्रनंतर सुधारित किंवा नवीन मागणीपत्र आल्यास त्या पदांचा समावेश अंतिम निकालात केला जाईल.(Services)पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे किंवा एखादा संवर्ग जाहिरातीत नमूद नसल्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी अर्ज न करणाऱ्या उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही

असे MPSCने स्पष्ट केले आहे.(Services) सामाजिक व समांतर आरक्षणासाठीची पदे तसेच विद्यमान पदसंख्येत बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊनच अर्ज करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी माहिती तपासत राहणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही अद्ययावत माहितीसाठी MPSC च्या अधिकृत अधिसूचना आणि सूचनांचे पालन करावे.

हेही वाचा :

 दुर्लक्ष न करता घ्या काळजी….

Renault Triber ची चावी तुमच्या हातात,

आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,