महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालविणाऱ्या(prostitution) व्हिनस कॉर्नर परिसरातील एका लॉजच्या चालक-मालकाला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. जयसिंग मधुकर खोत वय २६, रा. कुंभारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील एक व रायगड जिल्ह्यातील एक अशा दोन पीडितांची सुटका केली. छाप्यात ९ हजार २५० रोख, मोबाईल हँडसेटसह अन्य साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले की, महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन व्हिनस कॉर्नर परिसरातील एका लॉजमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.(prostitution) त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून आज सायंकाळी तेथे छापा टाकला. यावेळी मालक जयसिंग खोत याला ताब्यात घेतले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे (prostitution)अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षतील सहायक पोलिस निरीक्षक स्वाती यादव व उपनिरीक्षक राजेंद्र घारगे व हिंदुराव चरापले, पोलिस अंमलदार सायली कुलकर्णी, विलास किरोळकर, अश्विन डुणूंग, उत्तम सडोलीकर, राकेश माने, तृप्ती सोरटे, प्रज्ञा पाटील व अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

 दुर्लक्ष न करता घ्या काळजी….

Renault Triber ची चावी तुमच्या हातात,

आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,