इचलकरंजी : उत्तम प्रकाश टॉकीज जवळ असलेल्या अहिल्यादेवी होळकर मार्केट(Market area) परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या भागात वारंवार कचरा टाकला जातो आणि त्याचा योग्यवेळी उठाव होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात आले आहे.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी महापालिकेच्या कचरा उठाव व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कचऱ्याचा थर साचल्याने फक्त नागरिकच नव्हे तर मंडईत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर या परिसरात असलेली मुतारी (सार्वजनिक शौचालय) अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहे. त्यामुळे महिला मंडईत येण्यास टाळाटाळ करत आहेत, असेही नागरिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी लाईटची योग्य व्यवस्था नसल्याने हा परिसर अंधारात बुडतो आणि त्यामुळे ओपन बार सुरू असल्याची तक्रारही स्थानिकांनी केली आहे.

या अनधिकृत कृतींमुळे परिसरातील (Market area)व्यावसायिक आणि रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की,
👉 कचरा उठाव नियमित करावा,
👉 मुतारी स्वच्छ ठेवावी,
👉 लाईटची व्यवस्था करावी, आणि
👉 कचरा व्यवस्थापनासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी.
सध्या या ठिकाणी आरोग्य व स्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कारवाई करेल का?” हा प्रश्न आता शहरातील जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा :
जगात खळबळ! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा, 3D चा वापर करून शस्त्रे…
कोल्हापूर गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्…
आनंदाची बातमी! MPSC कडून ‘गट क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात