डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे एकच गोंधळ उडाला.(shock)भारत आणि अमेरिकेत अजूनही व्यापार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत करार होतील, असे अंदाज आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीला भारताची रणनीती नेमकी काय असणार यावर भाष्य केले. जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या पहिल्या शिखर परिषदेत बोलताना जयशंकर यांनी भाष्य केले. भविष्यात भारताची काय रणनीती असणार यावर जाहीरपणे भाष्य केले. जयशंकर यांनी म्हटले की, टॅरिफमुळे जागतिक व्यापार गणिते उलटली आहेत. खर्च नव्हे तर मालकी आणि सुरक्षितता हे आर्थिक व्यवहारांचे प्रमुख निकष बनले आहेत.

भारत यादरम्यान असाधारण अस्थिरता अनुभवत आहे. (shock)जागतिक उत्पादनाचा एक तृतीयांश भाग एकाच भौगोलिक प्रदेशात चीन केंद्रित आहे, पुरवठा साखळी मर्यादित आहेत. आपल्याला सध्या स्वदेशी वस्तूंवर आधारित राहावे लागेल आणि हाच सर्वात चांगला मार्ग आहे. टॅरिफमुळे आपल्या बाजारपेठेचा आपण कसा उपयोग करूव घ्यायचा हे माहिती होतंय. स्वदेशी वस्तूंवर आधारित राहिल्याने आपल्याला फायदा नक्कीच होईल.सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारत हा वेगाने डेटा पॉवर बनवत आहे. डेटा सेंटर्स बांधले जात आहेत आणि नोएडा आणि दक्षिण भारतात प्रमुख केंद्रे विकसित होत आहेत. डेटा ही भविष्याची भारताची ऊर्जा असून भारत त्याचे केंद्र बनत आहे. शस्त्रे बनवण्याची पद्धत बदलली असून ते अधिक धोकादायक बनवली जात आहेत. तंत्रज्ञानामुळे सार्वभौमत्वावर परिणाम झाला आहे.

अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट इशारा देत एस. (shock)जयशंकर यांनी म्हटले की, जर ट्रम्प टॅरिफचा वापर युद्धाचे शस्त्र म्हणून करत असतील तर भारत त्यांच्या 3D चा वापर नवीन रणनीतीचे शस्त्र म्हणून करेल. पहिल्यांदाच भारताने यावर थेटपणे भाष्य केले. काही दिवसांपूर्वीच एस. जयशंकर हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर होते, यावेळी त्यांनी अमेरिकेत थेट ब्रिक्स देशांची बैठक घेतली. ब्रिक्स समुहाला डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विरोध सुरूवातीपासूनच आहे.
हेही वाचा :
दुर्लक्ष न करता घ्या काळजी….
Renault Triber ची चावी तुमच्या हातात,
आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,