अमेरिकी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थी(students) आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आता या व्हिसासाठी तब्बल ₹88 लाखांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयानंतर भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी मिळणाऱ्या व्हिसामध्ये मोठी घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना दिलेल्या व्हिसांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्यांनी घटली आहे.
जुलै महिन्यात: 24,298 वरून फक्त 13,027 व्हिसा जारी
ऑगस्ट महिन्यात: 74,825 वरून 41,540 व्हिसांवर घसर
एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत आगमन 3,13,138 इतके नोंदवले गेले असून हे गेल्या वर्षाच्या तुलनेत 19 टक्के कमी आहे.दरम्यान, चीनच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात व्हिसा दिला जात आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारत-अमेरिका संबंध तणावात आले आहेत. याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या(students) व्हिसांवर होत असल्याचे संकेत आहेत.

याशिवाय, अमेरिकेतील काही विद्यापीठांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना देश सोडू नका असा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे भारतीय विद्यार्थी आता अमेरिकेऐवजी कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि युरोपियन देशांकडे वळताना दिसत आहेत.अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
काय सांगतं शास्त्र ?
‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश,
आजचा बुधवार राशींसाठी भाग्याचा! विठुरायाच्या कृपेने संकेट टळेल, धनलाभाचे योग, राशींचे राशीभविष्य