वास्तुशांती कार्यक्रमात विजेच्या धक्क्याने कागलच्या मुलाचा मृत्यू

इचलकरंजी नातेवाईकांच्या वास्तुशांती कार्यक्रमात विजेचा धक्का लागल्याने विहान शहाबाज शेख (वय 10, रा. शाहूनगर, कागल) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी माळ परिसरात घडली.(Ichalkaranji) याची वर्दी इकबाल मियालाल मुजावर (रा. कागल) यांनी दिली आहे.

कार्यक्रमात ठिकठिकाणी मोठे फॅन लावले होते. एका फॅनजवळ पाण्याचे जार होते. विहान हा पाणी घेण्यासाठी तिथे गेला असता त्याचा पाय फॅनला जोडलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटला लागला. (Ichalkaranji) त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो कोसळला. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत नातेवाईकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आयजीएम इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होती.

हेही वाचा

सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत

देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!

रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?