भरसभेत उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला ओपन चॅलेंज, Video पाहा

लोकसभा (parlment) निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली. या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ‘शिवसेनेचं नाव , पक्ष चिन्ह न वापरता लढून दाखवा, असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं.

उद्धव ठाकरे वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेत म्हणाले, काही क्षण असे येतात. तिथे भावना व्यक्त करणं अवघड असतं. तोच हा क्षण आहे. लोकसभा निकालानंतर वर्धापन दिन होत आहे. वर्धापन दिन म्हटलं, आता वर्ष मोजत नाही. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. मला सर्व देशभक्तांपासून मतदान दिलं. मारेन तर छकडा मारेन. तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलं. मात्र मी शून्य आहे. मी यशाचा मानकरी मी नव्हे, तुम्ही आहात’.

‘शिवसेनाप्रमुखांनी दोन गोष्टी सांगितल्या. आपल्याकडे आत्मविश्वास आणि अहंकार गोष्टी आहेत. मी करू शकतो हा आत्मविश्वास आहे. पण मी एकटाच करू शकतो, हा अहंकार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मोदींनी विषय बाजूला नेला’, अशी टीका ठाकरेंनी केली.

‘लोकसभेच्या निकालानंतर मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाईल, अशी अफवा पसरवली. छगन भुजबळ शिवसेनेत जाणार, अशी अफवा पसरवली. सरकार चालेल का, पडेल का? सरकार कोसळलंच पाहिजे. शिवसेनेला मुस्लिमांनी मतदान केलं असं पसरवलं. खरंतर सर्व देशभक्तांनी मतदान केलं. तिकडे डोमकावळे बसले आहेत. त्यांनी हिंदुत्व सोडलं असं पसरवलं, असे ठाकरे म्हणाले. ‘खरंतर नरेंद्र मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं, असं माझं ठाम मत आहे. २०१९ चा फोटो आहे. आज चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत का? मोदीजी, तुम्ही चंद्रबाबूंचा जाहीरनामा पूर्ण करणार, असं जाहीर केला. आमच्याकडे चोरीमारी नाही. त्यांना माहीत आहे की, शिवसेना समोर वार करेल. पण सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून नाही. लोकशाही वाचवण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, युट्यूबरनी मदत केली, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांची एकेरी भाषेत टीका; म्हणाले…

ऑनलाईन पार्सलच्या बॉक्समध्ये निघाला भलामोठा साप; व्हिडिओ वायरल

T-20 World Cup दरम्यान आयसीसीकडून हार्दिक पंड्यासाठी गुड न्यूज..