कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय; मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक

कोल्हापूर : शहरात वेश्या व्यवसायाविरोधात मुख्यमंत्र्यांची शिवसेना(Kolhapur) आक्रमक झाली आहे. शिवसेनेने मध्यरात्री जोरदार आंदोलन करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची पळता भुई थोडी केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मध्यरात्री आंदोलन करण्यात आलं. शहरातील वेश्या व्यवसायांमुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचं शिवसैनिकांचं मत आहे.

शहरातील विविध चौकांमध्ये रात्रीच्या वेळी खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक(Kolhapur) प्रकार उघड झाला आहे. व्हीनस कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात हा प्रकार सुरू होता. याविरोधात कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक झाली. मध्यरात्री जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांना पिटाळून लावलं.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला व्हीनस कॉर्नर परिसरात असणाऱ्या अनेक लॉजमध्ये लपलेल्या होत्या. या लपलेल्या महिलांना शोधून काढत शिवसैनिकांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने व्हिनस कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळं शाहूपुरी पोलिसांची प्रचंड दमछाक झाली.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन बसल्याचं देखील समोर आलंय. ‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’ असा शिवसैनिकांनी इशारा दिला आहे. मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी हे आंदोलन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केलंय. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

हेही वाचा :

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी उपाय

मुसळधार पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढून 25.11 फुटांवर