वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यात ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचार करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात, लोहगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (minor girl) पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचे काम सुरू आहे, (minor girl) अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर समाजात संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच शहरात एका वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी