मोठी बातमी! शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं, पोलिसांकडून महादेव जानकरांची उचलबांगडी राजू शेट्टी, विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे आंदोलन पेटलं आहे. आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा मोर्चा काढू नये यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टींसहीत आंबा बागायतदार ऊत्पादक अध्यक्षांना मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली होती, मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला, (Farmers) त्यामुळे वर्षा बंगल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन चिघळले आहे.

शेतकरी नेते ताब्यात आज वर्षा बंगल्याच्या परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. (Farmers) यावेळी महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलबांगडी करून नेलं. प्रमुख नेते ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या मोर्चाला विरोध केल्यानंतर बोलताना शेट्टी म्हणाले होते की, हा मोर्चा होणार म्हणजे होणार आम्ही मागे हटणार नाही. हे आंदोलन आम्हाला करू दिले नाही तर सरकारला त्यांचे परिणाम भोगावे लागतील. आम्हाला अनेक नोटीस आल्या त्याचा फरक पडत नाही. पोलिसांपेक्षा आमची ताकद जास्त आहे. मोर्चा घोषित होऊन 15 दिवस झाले आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती रहायला हवे होते.

शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तसेच इतरही अनेक नेत्यांना मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तसेच आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Farmers) त्यामुळे या भागात आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेताना महादेव जानकर यांची उचलबांगडी केली, यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आम्ही न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिक्रिया जानकर यांनी दिली आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी