विश्वास ठेवून मित्राच्या घरी गेली, तिथेच नको ते घडलं; भाईंदरमधील धक्कादायक घटना

भाईंदर पूर्व येथे एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता २८ एप्रिलला आपल्या मित्राच्या घरी गेली होती. त्या वेळी मित्राचा आणखी एक मित्र त्या ठिकाणी होता. (Bhayander) त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केले.

पोलिसांना सांगितले तर जीवे मारण्याची धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर अत्याचार करणाऱ्याने पीडितेला १२ मे रोजी पुन्हा भेटायला बोलावले. नाही आली तर तुला बघून घेईन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली.(Bhayander) त्याची माहिती पीडितेने आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने बुधवारी (ता. १३) नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या मित्राला अटक केली आहे तर अत्याचार करणाऱ्याचा शोध सुरू आहे.

मंडल अधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर आणखी तीन आरोपी फरार असून, त्यांच्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. यातील एका आरोपीला गुरुवारी (ता. १४) न्यायालयाने १९ मेपर्यंत कोठडी सुनावल्याची माहीती पोलिसांनी दिली.

अनधिकृत उत्खनन होत असल्याच्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. ११) तक्रारदाराकडील आत्माराम पाटील यांच्यासह मंडल अधिकारी खाणीवर पाहणी करण्यासाठी गेले होते. (Bhayander) दरम्यान, पाहणी करत असताना आरोपी बाप-लेकाने आपल्या सहकाऱ्यांसह आत्माराम पाटील यांचा दगडाने ठेचून खून केला होता. भालचंद्र लक्ष्मण पाटील, महेश भालचंद्र पाटील, आणि प्रताप भालचंद्र पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे असून, निकेत महेश पाटील, किरण पाटील आणि अन्य एक आरोपी फरार आहेत.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी