पीएम मोदी 15 मे पासून युएई आणि चार युरोपीय देश नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा हेतू व्यापारी आणि राजकीय संबंधांना मजबूत करण्याचा आहे. चला तर या देशांत भारताच्या 1000 रुपयांची किंमत किती ते पाहूया

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मे पासून पाच देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. १५ ते २० मे दरम्यान होणारा हा दौरा संयुक्त अरब अमिरात पासून सुरु होऊन युरोपच्या चार महत्वाच्या नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीपर्यंत पसरणार आहे. (PM Modi) या दौऱ्याचे राजकीय महत्व एकीकडे दुसरीकडे सर्वसामान्य भारतीयांच्या मनात उत्सुकता आहे की परदेशी बाजारात आपल्या भारतीय रुपयांची ताकद किती आहे. चला, तर या हाय प्रोफाईल दौऱ्यासोबत परदेशी चलनाच्या समोर भारताच्या १००० रुपयांची किंमत किती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यात पहिला मुक्काम संयुक्त अरब अमिरात ( UAE ) येथे आहे. १५ मे रोजी येथे पोहचून पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतील. व्यापारी दृष्टीने युएई भारताचा तिसरा सर्वात मोठा भागीदार आहे.(PM Modi) तेथे राहणारे ४५ लाख भारतीय या नात्याची मजबूत कडी आहेत.या देशाच्या आर्थिक आणि धोरणात्मक रणनीती सामंजस्य करारावर सर्वांची नजर टिकली आहे. सध्याच्या एक्सचेंज रेटच्या हिशेबाने भारताचे १००० रुपये युएईत ३८.३७ दिरहम होतात.
युएईनंतर पंतप्रधान नेदरलँडला जातील. नेदरलँडचे अधिकृत चलन युरो (EUR) आहे. ज्यास युरोपिय सेंट्रल बँकद्वारा नियंत्रित केले जाते. साल २००० मध्ये आपले जुने चलन डच गिल्डरला सोडून नेदरलँडने युरो चलन आपलेसे केले. येथे भारतीय चलनाची स्थिती खूपच कमजोर आहे. कारण भारताच्या १००० रुपयांची किंमत येथे केवळ ८.९६ युरोच्या बरोबर आहे. हे अंतर दोन्ही देशांची क्रय शक्ती आणि जागतिक बाजारातील चलनाची स्थिती स्पष्ट दर्शवते.
यूरोपीय संघाचा हिस्सा असूनही स्वीडनने आपली स्वतंत्र ओळख आणि चलन कायम ठेवले आहे. येथे ‘यूरो’ नव्हे तर ‘स्वीडिश क्रोना’ (SEK) चालते. पंतप्रधान मोदी येथे जेव्हा पोहचतील तेव्हा आर्थिक चर्चेच्या केंद्रामध्ये स्वीडनची टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन सेक्टर असेल. भारताचे १००० रुपये स्वीडन करन्सीत बदलल्यानंतर ९८.३२ स्वीडीश क्रोना बनतील. हा देश त्यांच्या मोठ्या कंपन्या आणि मजबूत एक्सपोर्ट सेक्टरच्या बळावर एक स्थिर अर्थव्यवस्था बनलेला आहे.
नॉर्वेचा दौरा पीएम मोदी यांच्यासाठी ऊर्जा आणि सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. नॉर्वे युरोपीय संघाचा सदस्य नाही. त्यांच्या स्वत:चे चलन ‘नॉर्वेजीयन क्रोन’ (NOK)चा उपयोग करतो. येथे भारताच्या १००० रुपयांची किंमत ९७.११ नॉर्वेजीयन क्रोन होते. तेल, नैसर्गिक गॅसचा विशाल साठे आणि कमी लोकसंख्या यामुळे नॉर्वेचे प्रति व्यक्ती उत्पन्न खूप जास्त आहे. ज्यामुळे त्याचे चलन जागतिक स्तरावर एक मजबूत आधार प्रदान करते.
इटलीत भारताच्या १००० रुपयांची किंमत दौऱ्यात शेवट पंतप्रधान इटलीला पोहचतील. इटली देखील नेदरलँडसारखा युरो (EUR) झोनचा भाग आहे. साल २००२ च्या आधी येथे ‘लीरा’चलन होते. (PM Modi) आता येथे भारताच्या १००० रुपयांची किंमत ८.९६ युरो आहे जी नेदरलँड येथे आहे. फॅशन, ऑटोमोबाईल आणि टुरिझमसाठी प्रसिद्ध इटलीची अर्थव्यवस्थेत भारतासाठी गुंतवणूकीच्या अनेक शक्यता आहे. युरोपीय सेंट्रल बँकच्या दिशा-निर्देशांवर चालणारा इटली आपली कला आणि लक्झरी ब्रँडद्वारे जगभरातून गुंतवणूक खेचत आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी