शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांदा खरेदीबाबत CM फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, दर जाहीर

मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला 2-3 रुपये किलोचा भाव मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा 2-3 रुपये किलोने विकावा लागत आहे. (onion farmers) त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे कांद्यासाठी किमान भाव जाहीर करण्याची मागणी केली होती. अशातच आता मुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कांदा विकत घ्या अशी विनंती मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. पुढे बोलताना फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळूनऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या संकट राज्य सरकार दूर करेल असा शब्द देतो. (onion farmers) ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना पोहोच राशी सुद्धा सरकारच्या माध्यमातून देणार आहोत अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

शिवराज सिंह चव्हाण यांनीही दिली कांदा खरेदीची माहिती यावेळी बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटले की, भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र दोन्हीकडे कमळ उगवले आहे. प्रत्येक गरिबाला पक्के घर दिले जाईल हा पंतप्रधानांचा मानस आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याच राज्याला 30 लाख खरं मिळाली नव्हती, मात्र महाराष्ट्राला 30 लाख घर मिळाले आहेत असं सांगताना कांद्याची खरेदी 12 रुपये 35 पैसे किमतीने सुरू केली जाईल अशी माहिती दिली आहे.

कांद्याच्या बाजारभावात सतत घसरण उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने येवल्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल केवळ सहाशे ते सातशे रुपये इतकाच दर मिळत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. (onion farmers) अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये प्रतिक्विंटल 1500 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी