राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (elections)होणार आहेत. राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच महायुती आणि कॉँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणूक होण्याआधीच एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने त्यांची साथ सोडली आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्याबाबत अजून अधिकृत घोषणा देखील झालेली नाही. मात्र निवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्याने त्यांची साथ सोडली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि आणखी एका नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीमध्येच पक्ष फोडाफोडी सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी(elections) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याने ७५० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. हा निधी दोन विशेष योजनांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या योजनांमुळे नगर विकास खात्याला पायाभूत सुविधा सुधारणा आणि विशेष प्रकल्पांसाठी निधी वाटपाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. तसेच, महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील प्रभागांना निधी वाटपाचे निर्णय घेण्याचा अधिकार नगर विकास खात्याच्या अंतर्गत राहणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून केलेल्या निधी वाटपात बहुतांश निधी महायुतीच्या आमदारांना जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः शिंदेसेनेच्या आमदारांना इतरांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या मतदारसंघांमध्ये येत्या काळात विविध कामकाज आणि विकास प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेसेनेला या भागांत फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

मतदारांची नावे आता पाहता येणार वेबसाईटवर; निवडणूक आयोगाने केली तयारी
दररोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला मिळतील 6 आश्चर्यकारक फायदे; होतील हे आजार दूर
RBI चा धक्कादायक निर्णय, बड्या बँकेचा थेट परवानाच रद्द, ठेवीदारांमध्ये खळबळ!Edit