पुर्वी मुलींनी 13 – 14 वर्षांनंतर मासिक पाळी येण्यास सुरुवात व्हायची पण आता, अनेक मुलींना वयाच्या 10 व्या वर्षाआधीच मासिक येते तर या बदलांची कारणे अनेकांना माहिती नसतील तर जाणून घ्या काय झालेत बदल

पूर्वी मोबाईल नव्हते, मुले बाहेर मोकळ्या वातावरणात खेळण्यासाठी जायचे. पण आता सर्वकाही बदललं आहे. मैदानी खेळाची जागा मोबाईलने घेतली आहे. (Girls) ज्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. विशेषतः मुलींच्या आरोग्यावर… गेल्या काही वर्षांपासून मुलींमध्ये वयाच्या दहाव्या वर्षापूर्वीच वयात येण्याचा कल वाढत आहे. हा शारीरिक बदल, जो पूर्वी 13 – 14 वर्षांच्या वयात दिसून यायचा, तो आता आठ-नऊ वर्षांच्या वयातच होत असल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आपल्या मुलींसोबत असे का घडत आहे? याच विचाराने अनेक पालक त्रस्त असतात. जेव्हा वयाच्या 10 वर्षांपूर्वी मासिक पाळी सुरू होते, तेव्हा अनेक पालकांना ही गोष्ट आरोग्यदायी आहे की, नाही याबद्दल शंका वाटते. स्त्रीरोग सल्लागार डॉ. दीप्ती अश्विन यांचे याबद्दल काय म्हणतात जाणून घेऊ…
लठ्ठपणामुळे अनेकदा मुलींना लवकर मासिक पाळी येते. जेव्हा शरीरातील चरबी वाढते, तेव्हा ‘लेप्टिन’ नावाचा एक हार्मोन तयार होतो, जो मेंदूला उत्तेजित करतो आणि तारुण्य येण्यास मदत करणाऱ्या इस्ट्रोजेन हार्मोन्सच्या क्रियेला गती देतो. जंक फूड आणि मिठाईचे अतिसेवन हे अनेकदा याचे कारण असते.जीवनशैलीतील समस्यांव्यतिरिक्त, (Girls) काही आरोग्यविषयक समस्यांमुळे देखील लवकर मासिक पाळी येऊ शकते. थायरॉईड विकार, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम , अधिवृक्क ग्रंथीचे विकार, अंडाशयातील गाठी आणि मेंदूशी संबंधित दुर्मिळ विकार यांसारख्या परिस्थितींमुळे हार्मोनल बदल होऊ शकतात, ज्यामुळे मुलींना दहा वर्षांच्या आधी मासिक पाळी येऊ शकते.
आपल्या सभोवतालच्या अनेक दैनंदिन वस्तूंमधील रसायने आपल्या हार्मोन्समध्ये बिघाड करू शकतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील बीपीएपासून ते सौंदर्यप्रसाधनांमधील रसायनांपर्यंत, ही सर्व रसायने आपल्या हार्मोन्समध्ये बिघाड करू शकतात. काही परफ्यूम आणि लोशनमध्ये पॅराबेन्स आणि थॅलेट्ससारखी रसायने असतात. ही रसायने शरीरातील नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडवतात.स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक व्यायाम कमी होणे यामुळे हार्मोन्समध्ये बदल होत आहेत. काही अभ्यासांनुसार, पुरेशी झोप न मिळाल्यास मेलाटोनिन या हार्मोनची पातळी बदलू शकते, (Girls) यामुळे भविष्यात मुलींमध्ये पीसीओडी सारखे आजारही उद्भवू शकतात.मुली लहान आहेत म्हणून त्यांना मानसिक ताण येत नाही, असे आपण म्हणू शकत नाही. कारण काही अभ्यासांनुसार, कौटुंबिक कलह किंवा इतर परिस्थितींमुळे येणारा तीव्र मानसिक ताण लहान मुलींमधील संप्रेरक ग्रंथींना कमी वयातच उत्तेजित करू शकतो. यामुळे वयाच्या 10 वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरू होऊ शकते.
आरोग्यदायी आहार: मुलींना लहानपणापासूनच फळे आणि भाज्यांचा समावेश असलेल्या स्थानिक आहाराची ओळख करून द्या. प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळणे उत्तम.
शारीरिक हालचाल: तुमची मुले दररोज किमान एक तास व्यायाम करतील याची खात्री करा. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास आणि हे हार्मोनल बदल पूर्ववत होण्यास मदत होईल.
प्लास्टिकचा वापर कमी करा: गरम पदार्थ प्लास्टिकच्या भांड्यात देण्याऐवजी ते स्टील किंवा काचेच्या भांड्यात द्या.
मोकळा संवाद: पालकांनी आपल्या मुलांशी नेहमी बोलावे. त्यांना मानसिक आधार द्यावा. तुम्हाला काही अधिक अडचणी असतील तर, तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी