राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.(Registration) या मुदतीनंतर म्हणजेच १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल,(Registration) अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
सरकारी आदेश धाब्यावर, अभूतपूर्व कोंडीत टोल वसुली, पैसे परत देण्याचं धोरणच नाही (Registration) यापूर्वी वाहनधारकांना एचएसआरपी बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कामाचा वेग आणि वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.वाहनचोरी, बनावट नंबर प्लेट्सचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी एचएसआरपी प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जुन्या वाहनांनाही ही नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी