इचलकरंजी शहरातील वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार(market) यंदा पहिल्यांदाच बंदीच्या छायेत आला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतीर्थ चौक, के.एल.मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर दरवर्षी दिवाळी बाजाराची लगबग दिसत असे. परंतु वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने यंदा हा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनासाठी दिवाळी बाजारासाठी पर्यायी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. यंदा थोरात चौक, आवळे मैदान आणि जिमनॅसियम मैदान या ठिकाणी दिवाळी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, मुख्य रस्त्यावरील कोणत्याही व्यापाऱ्याने आपल्या दुकानाबाहेर मंडप किंवा स्टॉल उभारला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही व्यापाऱ्याने मंडप घालण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य असेल. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, वर्षानुवर्षे मुख्य रस्त्यावर व्यापार करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये आणि फेरीवाल्यांमध्ये या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. “मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार हा आमच्यासाठी वर्षातून एकदा मिळणारा मोठा व्यापाराचा योग असतो. आता तो दुसरीकडे हलवण्यात आल्याने ग्राहकांची गर्दी कमी होईल,” अशी प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी दिली आहे प्रशासनाने मात्र नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. इचलकरंजी शहरात वाहतूक कोंडी टाळून, स्वच्छ आणि शिस्तबद्ध दिवाळी बाजार(market) आयोजित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :
व्हॉट्सअॅपवरून देहविक्रीचा रॅकेट….
गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्….; Video Viral
EPFO ची बंपर ऑफर! फक्त ‘हे’ काम करा आणि जिंका 21,000 रुपये