देवास जिल्ह्यातील उदयनगर संकूलातील सरकारी प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिक्षक विक्रम कदम हे एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे(classroom).

हा प्रकार झिरी मोहल्ला, बिसाली ग्रामपंचायत येथील प्राथमिक शाळेत घडला. शाळेतील काही विद्यार्थ्यांनीच शिक्षक आणि महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत शिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.स्थानिकांच्या मते, विक्रम कदम यांचे अशोभनीय वर्तन मागील काही दिवसांपासून सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी त्यांना तोंडी फटकारले होते, मात्र त्यानंतरही त्यांचे वर्तन बदलले नाही.

प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी हरिसिंह भारतीय यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, तपासासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. “अहवाल आल्यानंतर योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल,” असे अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान, शिक्षक विक्रम कदम यांनी व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. तथापि, स्थानिक रहिवासी आणि पालक वर्गात तीव्र रोष असून, दोषी शिक्षकावर तत्काळ निलंबन व कारवाई करण्याची मागणी होत आहे.या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, शाळांमधील शिस्त आणि सुरक्षित वातावरणाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे(classroom).

हेही वाचा :

व्हॉट्सअ‍ॅपवरून देहविक्रीचा रॅकेट….
गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्….; Video Viral
EPFO ची बंपर ऑफर! फक्त ‘हे’ काम करा आणि जिंका 21,000 रुपये