गुजरातच्या सूरत शहरातील साई जलाराम सोसायटीत ८ ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या भयानक घटनेत संदीप घनश्याम गौडने आपल्या भावाच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी आलेल्या मेहुणीवर(Sister-in-law) आणि मेहुण्यावर चाकूने हल्ला केला. संदीपवर आधीच पत्नी आणि तीन मुलांसोबत असताना, त्याने मेहुणीसोबत दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मेहुणीने हा प्रस्ताव नाकारला, त्यावरून कुटुंबात वाद आणि भांडणं उग्र रूप धारण केली.

संदीपने रागाच्या भरात मेहुणी निश्चय कश्यप आणि मेहुणी(Sister-in-law) ममता यांचा जागीच खून केला, तर सासू शकुंतला जखमी झाली, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी संदीपला उधना रेल्वे स्टेशन जवळून अटक केली. चौकशीत संदीप आणि मेहुणी यांचे WhatsApp चॅट तपासले असता, संदीपने वारंवार मेहुणीला अश्लील मेसेज पाठवलेले आणि व्हिडिओ पाठवलेले असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित कुटुंबीयांचे जबाब घेतले असून, आरोपीच्या मानसिक स्थितीची आणि घटनाक्रमाची सविस्तर चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरली जात आहे.
हेही वाचा :
नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार