मंत्री,पदाधिकार्‍यांनी घेतले मनावर काटकसर सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी शुक्रवारी अनोखा उपक्रम राबविला. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कागल-कोल्हापूर जनता गाडीतून प्रवास करत जिल्हा परिषद गाठली, (Kolhapur) तर उपाध्यक्ष तानाजी पाटील आणि आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी इलेक्ट्रिक बाईकचा वापर करून इंधन बचतीचा संदेश दिला.

जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत या कागलहून जनता गाडीतून दसरा चौकापर्यंत आल्या.(Kolhapur) तेथून त्यांनी अ‍ॅटो रिक्षाने जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रवास केला. शिक्षण समिती सभापती शीतल यादव आणि शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनीही बसने प्रवास केला. बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी इलेक्ट्रिक बाईकवरून हजेरी लावली.

उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथून नागाळा पार्कस्थित जिल्हा परिषद मुख्यालयापर्यंत इलेक्ट्रिक बाईकवरून प्रवास केला. (Kolhapur) सुमारे आठ किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी ये-जा असा पूर्ण केला.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी