गेल्या महिन्यात भारताने आशिया चषक जिंकला. आणि आता भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. मार्च २०२५ मध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा झाली असून, १९ ऑक्टोबर २०२५ पासून सामने सुरु होणार आहेत. आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा दौरा दुहेरी भेट आहे, असे म्हणायला हरकत नाही. क्रिकेट प्रेमींसाठी हा दौरा विशेष असण्याचे कारण म्हणजे, या सामन्यात भारतीय संघात असणारे सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील खेळणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर पहिल्यांदाच हे दोघे मैदानात उतरणार आहेत(big).

दरम्यानच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला काही दिवस बाकी असताना भारताच्या माजी क्रिकेटपटूने रोहित शर्मा संबंधित मोठे विधान केले आहे. २०२४ मध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्या नंतर विराट आणि रोहितने लगेचच T20 फॉरमॅट मधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते. कालांतराने त्यांनी टेस्ट क्रिकेट मधूनही निवृत्ती घेत असल्याचे निश्चित केले. अर्थातच आत फक्त ODI फॉरमॅट मध्ये हे दोघे खेळणार असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या आनंदाची लहर आहे.
“लोक म्हणत आहेत की, विराटच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. पण हे रोहित साठीही लागू होतं. रोहित आता कर्णधार नाही. गेल्या काही वर्षांत तो २० ते ३० धावांची खेळी करतोय आणि मोठ्या सामन्यांमध्ये ८० धावांची जिंकवून देणारी मोठी खेळी खेळतोय. त्याची कारकीर्द तशीच पुढे सरकली आहे. तो सातत्याने धाव करू शकला नाहीये”, असं वक्तव्य माजी क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांनी युट्युब चॅनेलवर बोलताना केलं आहे.

त्याचबरोबर हे रोहित-विराट यांचं या सामन्यात कसं प्रदर्शन राहील यावर चर्चा रंगात आली आहे. यासंबंधित चर्चा करताना मोहोम्मद कैफ म्हणाले,”जर दोघेही या मालिकेत अपयशी ठरले तर काय होणार? लोकं म्हणतील, दोघेही फॉर्ममध्ये नाहीयेत. पण तुम्ही जर दोघांची कारकीर्द पहिली, तर दोघेही २-३ डावात अपयशी ठरले आहेत. त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केलं आहे. चॅम्पियन ट्रॉफीतही त्याने सुरुवातीला ३०-४० धावा करून अंतिम सामन्यात त्याने सामनावीरचा पुरस्कार पटकावला”
टी-20 विश्व चषकाच्या सामन्यात विराट कोहोलीनेही विशेष प्रदर्शन केले नव्हते. परंतु अंतिम सामन्यात त्यानी ५९ बॉल मध्ये ७६ धावांची सामना जिंकवणारी खेळी खेळली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान काय होतं यावर सर्वांचं लक्ष लागलं असून त्या दोघांवरती चांगल्या प्रदर्शनाचा दबाव असेल.त्याचबरोबर वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी विराट आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू असायला हवे, ते जर वर्ल्डकप खेळले तर ही आपल्यासाठी अभिमानाची बाब ठरेल. ३-४ चार सामान्यांवरून कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. हे दोघेही मोठी पारी खेळण्यास सक्षम आहेत, असे देखील कैफचे मत आहे(big).
हेही वाचा :
व्हॉट्सअॅपवरून देहविक्रीचा रॅकेट….
गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्….; Video Viral
EPFO ची बंपर ऑफर! फक्त ‘हे’ काम करा आणि जिंका 21,000 रुपये