वूमन्स टीम इंडियासाठी(Team India) आणखी एक मोठी लढत सज्ज आहे. आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील भारताचा तिसरा सामना गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत अजिंक्य असलेल्या भारतीय संघासमोर आता विजयी हॅटट्रिकची संधी आहे.भारताने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकत शानदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मात करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून आत्मविश्वास उंचावला आहे.

मात्र, तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल दिसू शकतो. टीम इंडियाची स्टार ऑलराउंडर अमनजोत कौर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पुनरागमनासाठी सज्ज आहे.सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाची फलंदाज जेमीमाह रॉड्रिग्स हिने अमनजोतच्या कमबॅकचे संकेत दिले. तिने सांगितले,“अमनजोत आता पूर्णपणे ठीक आहे. तिला दुखापत नव्हती, ती आजारी होती आणि आता ती बरी झाली आहे,”असं जेमीमाहने स्पष्ट केलं.

अमनजोतला 5 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आजारपणामुळे विश्रांती घ्यावी लागली होती. तिच्या जागी रेणुका सिंह ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती.वूमन्स वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात अमनजोतने दमदार कामगिरी करत 56 चेंडूत 57 धावा ठोकल्या होत्या आणि 37 धावांत 1 विकेट घेतली होती. तिच्या त्या कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला होता.

आता ती पुन्हा पूर्णपणे फिट झाल्याने तिच्या पुनरागमनाने टीम इंडियाची(Team India) फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अधिक मजबूत होणार आहेत.भारतीय संघाने आतापर्यंतच्या स्पर्धेत स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या जोडीने उत्कृष्ट सलामी भागीदारी केली आहे. जेमीमाह, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनीही फलंदाजीमध्ये स्थिरता राखली आहे.आता पाहावं लागेल की अमनजोत कौरचा पुनरागमनासह भारत दक्षिण आफ्रिकेवर मात करून विजयी हॅटट्रिक नोंदवतो का, हे क्रिकेटप्रेमींसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा :

पत्नीनेच केले पतीचे अपहरण; कारण ऐकून पोलिसही चक्रावले
रोहितची कॅप्टन्सी जाताच खास भिडूचा टीम इंडियातून पत्ता कट, कोण आहे तो?
लग्न झालेल्या गर्लफ्रेंडची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या…