निवारी जिल्ह्यातील राजपुरा गावात एका अवैध प्रेमसंबंधातून क्रूर हत्येची घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रतिराम राजूपत या आरोपीचा लग्नापूर्वीच एका विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध होता. हा संबंध लग्नानंतरही सुरू राहिला. परंतु महिलेने आपल्या पतीला सोडून रतिरामशी लग्न करण्याचा दबाव सुरू केला, ज्यामुळे आरोपी अस्वस्थ झाला आणि त्याने आपल्या मित्रांसह तिच्या हत्येचा कट रचला(murdered).

२ ऑक्टोबरच्या रात्री रतिरामने प्रेयसीला घरी बोलावले. रात्री दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध झाले, पण त्याचवेळी रतिरामने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याच्या मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञानसिंग यांच्या मदतीने मृतदेह घराच्या मातीच्या फरश्याखाली खोल खड्डा खोदून पुरण्यात आला. जागा माती व शेणाने लेपून सामान्य स्थितीत आणण्यात आली, आणि त्यावर पलंग ठेवण्यात आला. आरोपी त्या ठिकाणी दोन दिवस झोपत राहिला.
महिलेच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे रतिरामला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. रायसिंह नरवारियांच्या माहितीनुसार, आरोपीने बलात्कार करून निर्दयीपणे हत्या केली आणि मृतदेह घरात पुरला.

सध्या आरोपी पोलिस कोठडीत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने ठाण्यातून फरार झाला आहे. निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, फरार आरोपी व त्याच्या मित्रांचा शोध सुरू आहे(murdered).
हेही वाचा :
RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत
दूषित पाण्याचा कहर….
सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता