बंगळुरूमध्ये साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता हेमंत कुमार विरोधात सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं(actress) लैंगिक छळाची तक्रार दाखल केली असून, तत्काळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हेमंत कुमार यांनी 2022 मध्ये अभिनेत्रीशी संपर्क साधून तिच्या आगामी चित्रपट ‘रिची’ मध्ये काम देण्याचं आश्वासन दिलं होतं. या करारानुसार दोघांमध्ये 2 लाख रुपयांचा करार झाला, ज्यामध्ये 60,000 रुपये आगाऊ दिले गेले. मात्र, सिनेमाचं शुटिंग आणि रिलीज होण्यात उशीर झाल्यामुळे अभिनेत्री निराश झाली.

तक्रारीनुसार, हेमंत कुमारने अभिनेत्रीला(actress) काही अत्यंत अश्लील कपडे वापरायला सांगितले आणि अश्लील सीन करण्यासाठी प्रेशर टाकला. तसेच, चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला. अभिनेत्रीने तक्रारीत नमूद केले की, मुंबई दौऱ्यादरम्यानही तिला त्रास दिला गेला आणि नकार दिल्यानंतर हेमंतने तिला गुंडांकडून धमकावले.

शूटिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माता दिलेला चेक बाऊन्स झाला, तसेच अभिनेत्रीच्या संमतीशिवाय चित्रपटातील अश्लील सीन शूट करण्यास भाग पाडलं आणि हे सीन सोशल मीडियावर पोस्ट करण्यासही जबरदस्ती केली.अभिनेत्रीनं दिलेल्या तक्रारीनंतर राजाजीनगर पोलिसांनी हेमंत कुमारला अटक केली आणि न्यायालयीन कोठडीत पाठवलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, आणि पोलिस आरोपीच्या कारवाईसाठी पुढील पावले उचलत आहेत.

हेही वाचा :

भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ….
अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं…बैठकीत नेमकं काय घडलं?
डी के एस सी मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस संपन्न…