इचलकरंजी: दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज(college) इचलकरंजी येथे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिवस या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर समारंभ प्रमुख पाहुणे डॉ. युवराज देवाळे यांच्या उपस्थितीत व मा. प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.आपल्या मनोगतामध्ये बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. युवराज देवाळे म्हणाले, “अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

आपल्या भाषेचा म्हणून १५०० ते २००० हजार वर्षाचा स्वतंत्र इतिहास आहे. शिलालेख, ताम्रपट, संत साहित्य, ऐतिहासिक साहित्यातले सर्व संदर्भ आणि मागील काही शतकांमधील विपुल साहित्य कृतींची निर्मिती हा सगळा इतिहास मराठी भाषेला अभिजात बनवण्यामध्ये महत्त्वाचा ठरला.” अशा आशयाचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांनी ” मराठी आपली मातृभाषा आहे. आयुष्य आणि करिअर समृद्ध करत असताना इतर भाषा आत्मसात केल्याच पाहिजेत परंतु मातृभाषेवर नितांत प्रेम करत मातृभाषेतील विपुल साहित्य संपदा आपण वाचायला हवी(college).

आपल्या मातृभाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही आपल्या सर्वांसाठी प्रचंड आनंदाची बाब आहे” दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि संस्थाप्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रो. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. यावेळी प्रा. डी. ए. यादव, प्रा. व्ही. पी. पाटील, डॉ. प्रभा पाटील, प्रबंधक श्री. आर. बी. जोग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. भारती कोळेकर यांनी तर आभार प्रा. रोहित शिंगे यांनी केले मानले. यावेळी गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
काय सांगतं शास्त्र ?
‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश,
आजचा बुधवार राशींसाठी भाग्याचा! विठुरायाच्या कृपेने संकेट टळेल, धनलाभाचे योग, राशींचे राशीभविष्य