सोशल मीडियावर एका थरारक व्हिडीओची मोठी चर्चा आहे.(bullets) या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात बंदूकीने जमिनीवर कोसळलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडत असल्याचे दिसते. लाईव्ह गोळीबाराचा हा भयानक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील मेरठ या ठिकाणचा असल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ज्याची गोळ्या झाडून हत्या झाली, त्याचे नाव आदिल असे आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आदिल जमिनीवर पडलेला दिसतो. लोअर्स आणि टी-शर्ट घातलेला आरोपी आदिलवर गोळ्या झाडतो. हा व्हिडीओ आरोपीने स्वत: रेकॉर्ड केला आहे. त्याने आदिलवर एकामागून एक अशी तीन गोळ्या झाडल्या.

आदिलवर गोळीबार करत असताना आरोपी आणि त्याचे साथीदार या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात. (bullets) या गंभीर प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. बेशुद्ध झाल्यानंतर आदिलवर गोळ्या झाडण्यात आल्या की त्याच्या मृतदेहावर गोळ्या झाडण्यात आल्या याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीने प्रथम आदिलचा गळा दाबून नंतर त्याच्यावर गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे.

मेरठमधील लोहिया नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नरहडा गावात एका तरुणाचा मृतदेह आढळला. दुपारी त्याची ओळख २५ वर्षीय आदिल म्हणून पटली.(bullets) मृतक आदिल हा लिसाडी गेट पोलिस स्टेशन परिसरातील राधना वली गली येथील रहिवासी होता. आदिलच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आरोपींनी आदिलला जंगलात बेशुद्ध केले आणि नंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :
आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .
राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…