पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी(crime) वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.

दुकानाबाहेरील शेड अनाधिकृत असल्याबाबत महापालिकेत तक्रार करणार आहे, अशी धमकी देऊन दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीससह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी कॅम्पात १७ सप्टेंबर रोजी घडला आहे. तक्रार दाखल होताच पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक(crime) केली आहे.
काँग्रेस युवा प्रदेश सरचिटणीस पंकज बगाडे (वय ४०, रा. आकुर्डी), गणेश दराडे (वय ५०, रा. रमाबाईनगर, पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. शाम अर्जुनदास मेघराजानी (वय ५८, रा. सुखवाणी सिटी समोर, वैभवनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी बगाडे हा युवक काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आहे. फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. १७ सप्टेंबर रोजी आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानामध्ये आले. तुमच्या दुकानाबाहेरील शेड हे अनाधिकृत आहे. त्याबाबत आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून फिर्यादी यांच्याकडे ५० हजार रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही तर गाडी अंगावर घालुन जिवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळ केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी २६ सप्टेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ओळखीचे दुकानदार यांनाही यापुर्वी अशीच धमकी देऊन वेळोवेळी पैशाची मागणी केल्याचेही उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे तपास करीत आहेत.
हेही वाचा :
महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा : पगार व पेन्शन खात्यावर जमा
करिनाच्या नावासोबत आपल्या…..कियारा प्रचंड संतापून म्हणाली, ‘मी हे…’
…अन् 10309 तरुणांना लागला Government Job; ‘या’ तारखेला सरकार देणार नियुक्ती पत्रं