रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद

प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता रेल्वेने प्रवास करत असाल (berths) तर हा महत्त्वाचा निर्णय वाचा. भारतीय रेल्वेने आता रेल्वे प्रवासादरम्यान बर्थवरून होणाऱ्या प्रवाशांच्या वादांवर कठोर भूमिका घेतली आहे. विशेषतः खालच्या आणि मधल्या बर्थच्या वापराबाबत अनेकदा प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत असल्याने रेल्वेने यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या सूचनांनुसार, आरक्षित डब्यांमधील मधला बर्थ दिवसा उघडा ठेवता येणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

जोधपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (berths) हितेश यादव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मधल्या बर्थवरून प्रवाशांमध्ये वारंवार वाद होतात. काही प्रवासी दिवसभर मधला बर्थ उघडा ठेवतात, त्यामुळे खालच्या बर्थवर बसणाऱ्या इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.

रेल्वे बोर्डाने यापूर्वी २०१७ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आरक्षित डब्यातील मधला बर्थ केवळ रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंतच उघडता येईल. सकाळी ६ नंतर तो बंद ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाचा उद्देश खालच्या बर्थवरील प्रवाशांना आरामात बसण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. रेल्वे प्रशासनाने या नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार टीटीईंना दिले आहेत.

प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाल्यास टीटीई संबंधित नियम लागू करून (berths) परिस्थिती नियंत्रणात आणू शकतील. रेल्वेच्या या निर्णयाचे अनेक प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेचे नियम जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. माहितीच्या अभावामुळे अनेकदा छोट्या कारणांवरून वाद निर्माण होतात. त्यामुळे आता रेल्वेने स्पष्ट नियम लागू करून प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आरामदायी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?