मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चौथं अपत्य झालं तर नोकरी जाण्याची भीती वाटल्याने एका शिक्षक(teacher) दाम्पत्याने तीन दिवसांच्या बाळाला जंगलात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळावर दगड ठेवून ते जंगलात टाकण्यात आले होते. या प्रकारामुळे परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे.

ही घटना छिंदवाडा जिल्ह्यातील धनोरा येथील नांदनवाडी परिसरात घडली. रविवारी रात्री पोलिसांना माहिती मिळाली की रोड घाटजवळ जंगलात दगडाखाली एक नवजात बाळ सापडले आहे. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी बाळाचे आई-वडील शोधून काढले. आरोपी वडिलांचे नाव बबलू डांडोलिया असून तो नांदनवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक(teacher) म्हणून कार्यरत आहे. तर पत्नीचे नाव राजकुमारी डांडोलिया असे आहे. तामिया गावात राहणाऱ्या या दाम्पत्याला चौथं अपत्य झाल्याची भीती होती. चौथ्या अपत्यामुळे नोकरी गमवावी लागू शकते, या भीतीने त्यांनी नवजात बाळाला जंगलात टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी बबलू व त्याची पत्नी यांना अटक केली असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. “आमची आधीच तीन अपत्ये आहेत. चौथं अपत्य झाल्याचं समजल्यास नोकरी जाण्याची भीती होती. म्हणूनच बाळाला जंगलात दगडाखाली ठेवले,” असे कबूल करत आरोपी शिक्षकाने गुन्हा मान्य केला आहे.

२००९ पासून शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या बबलू डांडोलियाने अशा प्रकारे निर्दयतेने स्वतःच्या लेकराला जंगलात टाकल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा तपास सुरू असून, बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

आभाळ फाटलय खरं पण जोडता येतय बरं..!

ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा दसरा मेळावा का महत्त्वाचा ?

‘मला सेक्सी म्हणाले अन् बाथरुमबाहेर जवळ येऊन…’, अभिनेत्रीचा प्रसिद्ध दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप