संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूची या मोसमात 40 पेक्षा अधिक धावा करण्याची चौथी वेळ ठरली. चेन्नईने यासह चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवला. चेन्नईला या विजयानंतर किती फायदा झाल? जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला. चेन्नईने 156 धावांचं आव्हान हे 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सचा हा या मोसमातील एकूण पाचवा आणि दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला.(Chennai Super) तसेच चेन्नई सुपर किंग्सचा दिल्लीत डीसी विरुद्धचा इतिहासातील 9 सामन्यांमधील हा एकूण सातवा विजय ठरला. चेन्नईने यासह प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. चेन्नई या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
मोसमात काही दिवस प्लेऑफसाठी एकतर्फी चुरस पाहायला मिळत होती. तेच ते 4 संघ टॉप 5 मध्ये कायम होते. मात्र आता इतर संघांनी जोरदार कमबॅक करत प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला आहे. चेन्नईनेही दिल्लीला पराभूत करत निर्णायक विजय मिळवला आहे. चेन्नईने या विजयासह प्लेऑफचा दावा मजबूत केला आहे. तर दिल्ली प्लेऑफपासून काहीशी दूर गेली आहे.
चेन्नईचा दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय संजू सॅमसन हा चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 156 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक योगदान दिलं. संजूने 87 धावांची नाबाद खेळी केली. संजूने केलेल्या खेळीच्या जोरावर चेन्नईला 18 ओव्हरआधीच सामना जिंकता आला. दिल्लीला हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा हिशोब करणयाची संधी होती. मात्र दिल्लीने ती संधी गमावली. दोन्ही संघ 11 एप्रिलला आमेनसामने आले होते. तेव्हाही चेन्नईने दिल्ली लोळवलं होतं.
चेन्नईला विजयानंतर किती फायदा?
चेन्नईचा हा 10 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला. (Chennai Super)तर चेन्नईने 5 सामनेही गमावले आहेत. चेन्नईने विजयासह 2 गुणांची कमाई केली. चेन्नईचा नेट रनरेटही सुधारला. मात्र यलो आर्मीला पॉइंट्स टेबलमध्ये काही फायदा झालेला नाही. चेन्नईचा ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. चेन्नई नेट रनरेट हा +0.151 असा झाला आहे जो सामन्याआधी +0.005 असा होता.
दिल्ली कॅपिट्ल्सचं काय?
दरम्यान दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. दिल्ली हा सामना जिंकून चेन्नईचा हिशोब करण्यासह पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान सुधारण्याची संधी होती.(Chennai Super) मात्र दिल्लीने ही संधी गमावली. दिल्लीच्या खात्यात 10 सामन्यानंतर 8 गुण आहेत. दिल्लीने उर्वरित 4 सामने जिंकले तरी ते स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचू शकतात. मात्र दिल्लीला आता जिंकून चालणार नाही. दिल्लीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यामुळे दिल्ली उर्वरित सामन्यांत कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?