प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बँकिंग, रेल्वे, टपाल कार्यालय, क्रेडिट कार्ड,(banned) गॅस सिलेंडरच्या किंमतीसंदर्भात काही ना काही बदल होतो. 1 ऑक्टोबर 2025 पासून देशभरातही मोठे बदल लागू होत आहे. रेल्वे तिकीट बुकिंग आणि आरक्षणापासून त्याची झलक पाहायला मिळेल. तर राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीसंबंधी नियमात बदल होत आहे. तर युपीआयवर 100 रुपये पाठव, 200 रुपये पाठव अशी रिक्वेस्ट पाठवणाऱ्या मित्रांपासून आता सुटका होणार आहे. तर 1 ऑक्टोबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतो की नाही याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. सणासुदीत किंमती कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे. काय काय आहेत हे बदल जाणून घ्या.

रेल्वेने पहिल्यांदा ट्रेनमध्ये तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला होता. त्यातंर्गत तात्काळ तिकीट बुकिंग करताना आधार व्हेरिफिकेशन, पडताळा आवश्यक होता. आता आता जनरल आरक्षणासाठी सुद्धा ई आधार व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.(banned) तिकीट बुकिंग करताना सुरुवातीला 15 मिनिटांचा कालावधी ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी असेल.ऑनलाईन गेमिंग कायदा 2025 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. हा कायदा आणण्यापूर्वी सरकारने गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर लोकांनी चर्चेच्या फेऱ्या केल्या आहेत. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 मुळे रिअल मनी गेमिंगवर पूर्णपणे बंदी येणार आहे. तर पैशांआधारीत ऑफर्स, त्याचा प्रचार, प्रसारास बंदी आहे. ऑनलाईन गेम खेळल्यास कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. पण रिअल मनी गेमचे प्रमोशन ऑफर्स देणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

1 ऑक्टोबर 2025 पासून UPI युझर्ससाठी महत्त्वाचा बदल होत आहे. आता PhonePe, Paytm वा दुसऱ्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरून मित्र, नातेवाईकांकडे पैशांची रिक्वेस्ट पाठवता येणार नाही. UPI चे कलेक्ट रिक्वेस्ट, पूल ट्रान्झॅक्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. कारण अनेक जण पेमेंट रिक्वेस्ट पाठवून समोरच्याला हैराण करत होते.राष्ट्रीय निवृत्ती निधी नियंत्रक प्राधिकरणाने राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीत मोठा बदलास होकार भरला आहे.(banned) हा नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. त्याला मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क असे नाव देण्यात आले आहे. त्यातंर्गत सरकारी कर्मचारी नसलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, गिग वर्कर्स यांना पॅन कार्ड क्रमांकावरून अनेक योजनेत थेट गुंतवणूक करता येईल.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं