पुण्याच्या मंचरमध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने(accident) परिसर हादरला आहे. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघालेल्या १९ वर्षीय ऋतुजा चंद्रकांत पारधी हिला भरधाव कारने धडक दिल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी पिंपळगाव फाटा परिसरात घडली. रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पायी जात असताना कारने जोरदार ठोकर दिल्यामुळे ऋतुजा सात-आठ फूट हवेत फेकली गेली आणि रस्त्यावर कोसळली. अपघातात तिच्या डाव्या पायाला आणि टाचेला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यात वाहनचालकाची चूक स्पष्टपणे दिसून येते. धडकेनंतर कारचालक शरदराव शिंदे यांनी ऋतुजाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र या गंभीर घटनेनंतरही मंचर पोलिसांकडे तक्रार नोंदवली गेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांनी ऋतुजाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले असले तरी या अपघातामुळे(accident) स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा :

नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा
गॅस ग्राहकांसाठी महत्वाची माहिती….