बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान आपल्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक कठीण लढाई फार कमी लोकांना माहीत आहे. सलमानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया(trigeminal neuralgia) या दुर्मिळ आणि असह्य वेदना देणाऱ्या आजाराचा तब्बल साडेसात वर्ष सामना करावा लागला. चेहऱ्याच्या मज्जातंतूंमध्ये होणाऱ्या या आजारामुळे त्याला प्रत्येक काही मिनिटांनी तीव्र झटके बसायचे आणि डोकं, जबडा व चेहऱ्यावर असह्य वेदना व्हायच्या.

सलमानच्या मते, या वेदना इतक्या तीव्र असायच्या की दररोज ७५० मि.ग्रॅ. वेदनाशामक औषधे घेऊनही त्याला आराम मिळत नसे. खाणे-पिणे, बोलणे आणि साधी दैनंदिन कामे करणे देखील त्याच्यासाठी कठीण झाले होते. “नाश्ता करण्यासाठी अर्धा तास लागत असे, डिनरमध्ये मी फक्त ऑमलेट खायचो, कारण वेदना सहन होत नव्हत्या,” असे तो सांगतो. सलमानने खुलासा केला की, पहिल्यांदा ‘पार्टनर’ चित्रपटाच्या सेटवर त्याला या आजाराच्या वेदना जाणवल्या. त्या वेळी लारा दत्ताने त्याच्या चेहऱ्यावरचा केस हलवला आणि त्याच क्षणी त्याला असह्य झटका बसला.
या आजाराला “सुसायडल डिसीज” असे म्हटले जाते, कारण वेदना इतक्या प्रचंड असतात की रुग्णाला जगणे अवघड होते. सलमानने शेवटी गामा नाईफ सर्जरी करून घेतली ज्यामध्ये चेहऱ्यावर स्क्रू बसवून उपचार केले गेले. डॉक्टरांच्या मते, या शस्त्रक्रियेमुळे २० ते ३० टक्के वेदना कमी होतात, मात्र सलमानने आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने या आजारावर मात केली. आजही त्याने या त्रासातून बाहेर पडत आपल्या करिअरसोबतच फिटनेस आणि बॉडीबिल्डिंगकडे लक्ष ठेवले आहे(trigeminal neuralgia).
हेही वाचा :
का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या
अभिषेक शर्माची फटकेबाज अर्धशतकी खेळी; फ्लाइंग किसने रंगत वाढवली!
जया बच्चन यांनी अभिनेत्याला बेदम मारलं तेव्हा…