बॉलीवूडचे महानायक(superstar) अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचे किस्से कायम चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, विशेषत: जया बच्चन यांचा राग. अलीकडेच भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी त्यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींविषयी एक मोठा खुलासा केला आहे.2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगा देवी’ या भोजपुरी चित्रपटात अमिताभ-जया बच्चन आणि निरहुआ यांनी एकत्र काम केले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निरहुआ यांनी सांगितले की, बिग बी सेटवर सर्वांना हसवायचे, मजेशीर वातावरण निर्माण करायचे. परंतु जया बच्चन मात्र रागीट स्वभावासाठी ओळखल्या जातात.

निरहुआ म्हणाले, “एक सीन होता ज्यात मला माझ्या पत्नीला ओरडायचं आणि मारायचं होतं. तो सीन पूर्ण झाल्यानंतर जया बच्चन अचानक माझ्यावर काठीने मारू लागल्या. मी आश्चर्याने विचारलं का मारलंत, तर त्या म्हणाल्या – तू माझ्या सूनेला कसं मारलं? त्या खूप रागीट आहेत… दोन-तीन वेळा त्यांनी मला काठीने मारलं.”तरीदेखील निरहुआ यांनी या अनुभवाला एक आशीर्वाद मानलं. “जया बच्चन आणि अमिताभ बच्चन(superstar) माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हेच भाग्य आहे. त्यांनी मला दिलेला मारही मी प्रसादासारखा स्वीकारला,” असं ते म्हणाले.

निरहुआ पुढे म्हणाले, “जेव्हा मला समजलं की मला बच्चन दांपत्यासोबत काम करायचं आहे, तेव्हा मी भारावून गेलो. माझ्यासाठी ते स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होतं. अमिताभजींनी माझा संकोच ओळखून सेटवर विनोद करून वातावरण हलकं-फुलकं केलं.”बॉलीवूड आणि दक्षिणेकडील चित्रपटांबरोबरच अमिताभ-जया बच्चन यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडली आहे. ‘गंगा देवी’, ‘गंगा’ आणि ‘गंगोत्री’ या चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

घराच्या ‘या’ दिशेला ठेवा या काही गोष्टी,
सर्दीमुळे नाक बंद झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, 
GST कमी झाला आणि ‘या’ कारची किंमत एका झटक्यात 1.20 लाख रुपयांनी उतरली,