बंद नाकामुळे अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे(nose) झोपेचा अभाव आणि डोकेदुखीचा त्रास सतावत असतो. अशातच बंद नाकाच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर कोणतेही औषध घेण्याऐवजी आता हे घरगुती उपाय आराम देतील. चला तर मग आजच्या लेखात या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

धूळ, अॅलर्जी आणि बदलत्या हवामानामुळे अनेकदा सर्दीचा त्रास होत असतो आणि त्यामुळे नाक बंद पडणे यासारख्या समस्या निर्माण होत असतात. नाक बंद पडल्याने अनेकवेळा (nose)श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो. तर रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक वाढते, ज्यामुळे पुरेशी झोप घेता येत नाही. त्यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जाही कमी होते. सर्दीमुळे नाक बंद झाल्याने लहान असो वा मोठे सर्वांनाच त्रास होतो आणि शक्य तितक्या या समस्येपासून लवकर आराम मिळावा यासाठी अनेक उपाय करत असतो.

बंद नाक सहज उघडता यावे यासाठी बाजारात इनहेलर आणि औषधे उपलब्ध आहेत. मात्र काही घरगुती उपायांचा अवलंब करून घरी आराम मिळू शकतो. हे उपाय केवळ प्रभावीच नाहीत तर त्वरित आराम देणारे आणि सोपेही आहेत. जर तुम्हालाही बंद नाकाचा त्रास होत असेल आणि रात्री नीट झोप येत नसेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या या लेखात आपण काही प्रभावी उपाय जाणून घेऊयात.
मोहरीचे तेल आराम देईल
आयुर्वेदात बंद नाक साफ करण्यासाठी मोहरीचे तेल खूप प्रभावी असल्याचे म्हटले आहे. तुम्ही तुमच्या नाकात मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकू शकता. तसेच तुम्ही मोहरीच्या तेलात अदरक टाकून थोडे तेल गरम करा. पर्यायी म्हणून तुम्ही तुमच्या बोटाला मोहरीचे तेल लावू शकता आणि त्याचा वास घेऊ शकता. यामुळे बंद नाकापासून लवकर आराम मिळतो.
ओवा देखील आहे फायदेशीर
ओव्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळतो. यामुळे नाक बंद होण्यापासूनही आराम मिळतो. यासाठी थोडासा ओवा तव्यावर भाजून घ्या आणि गरम भाजलेल्या ओवा एका रूमाल बाधून घ्या. आता रूमालात बांधलेल्या गरम गरम ओव्याचा हळू हळू वास घेतल्यानेही नाक बंद झाले असेल तर लवकर आराम मिळतो. त्याचबरोबर सर्दीपासूनही आराम मिळतो.
गरम पाण्याची वाफ घेणे देखील फायदेशीर आहे
बंद नाकासाठी गरम पाण्याची वाफ घेणे हा सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. लोक सहसा सर्दी आणि फ्लू झाल्यावर वाफ घेतात. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते आणि बंद नाक साफ होते. तुम्ही गरम पाण्यात विक्स किंवा कडुलिंबाची पाने टाकून वाफ घेणे फायदेशीर ठरेल. झोपण्यापूर्वी काही मिनिटे वाफ घेतल्याने तुमचे बंद नाक साफ होण्यास मदत होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.
शरीर हायड्रेटेड ठेवा
नाकात पाणी कमी असल्यानेही नाक बंद होऊ शकते. म्हणून, सर्दी होत असताना दिवसभरात तुम्ही किती द्रवपदार्थांचे सेवन करता याकडे लक्ष द्या. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानेही सर्दी लवकर कमी होण्यास मदत होते आणि नाक बंद होण्याचेही समस्या टाळता येते.
हेही वाचा :
सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली?
अपकमिंग आयफोन सिरीजबाबत समोर आली मोठी अपडेट!
फ्रिजमध्ये कणीक किती काळ सुरक्षित? जाणून घ्या योग्य आणि अयोग्य पद्धत