आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीच्या (stressful)आहाराच्या सवयी हृदयावर घातक ठरतात; उशिरा जेवण, तळलेले अन्न, जास्त मीठ-शुगर यावर ताबडतोब नियंत्रण आवश्यक आहे.

आजकाल हृदयाच्या आजारांनी जगभरात मृत्यूचं मुख्य (stressful)कारण बनलं आहे. यामागे आपल्या जीवनशैलीचा मोठा हात आहे. आपल्या आहाराच्या सवयींमध्ये अनेक बदल झाले आहेत, जे थेट हृदयावर परिणाम करतात. अनेकदा लोक या सवयींकडे दुर्लक्ष करतात, पण वेळेवर सुधारणा न केल्यास हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
रात्री उशिरा जेवण:
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उशिरा जागणे आणि रात्री उशिरा जेवण करणे सामान्य झाले आहे. मात्र, हे हृदयासाठी घातक ठरू शकते. उशिरा जेवण केल्यास पचनाची प्रक्रिया झोपताना देखील सुरू राहते, ज्यामुळे झोप बिघडते तसेच ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल स्तर वाढतो. त्यामुळे रात्री उशिरा जेवणारे लोक हृदयाच्या आजारांना अधिक बळी पडतात.
जास्त तळलेले अन्न:
समोसे, कचौरी, पकोडे, फ्रेंच फ्राइज यांसारखी तळलेली पदार्थ हृदयासाठी धोकादायक आहेत. यात ट्रान्स फॅट्स आणि सॅचुरेटेड फॅट्स जास्त असतात, जे धमन्यांमध्ये प्लॅक जमा करतात आणि रक्तप्रवाह कमी करतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो.
जास्त रिफाइंड कार्ब्सचे सेवन:
मैदा, पांढरे तांदूळ, साखर यासारख्या पदार्थांमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. हे कार्ब्स शरीरात लवकर साखरेत रूपांतरित होतात, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढतो. दीर्घकाळ या सवयीमुळे लठ्ठपणा, डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर सारखे आजार निर्माण होतात, जे हृदयाच्या आजारांचे महत्वाचे धोके आहेत.
जास्त मीठ आणि साखर:
जास्त मीठ हृदयावर दबाव आणते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. तसेच, जास्त साखर लठ्ठपणा, डायबिटीज आणि हाय ट्रायग्लिसराईड्स वाढवते, ज्यामुळे हृदयाच्या आजारांना निमंत्रण दिले जाते.
त्यामुळे जर तुम्हाला देखील या सवयी असतील तर आताच त्यावर आळा घाला. अन्यथा, उशीर झाला की काहीच करता येणार नाही.
हेही वाचा :
आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…!
आज नवरात्रीची महासप्तमी राशींसाठी भाग्यशाली! देवीचं प्रचंड पाठबळ, धनलाभाचे योग,
Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल