शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या (worshipped)आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. यालाचा दुर्गाष्टमी असे देखील म्हटले जाते. यावेळी कधी आहे अष्टमी तिथी, पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या

शारदीय नवरात्रीमध्ये आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पूजा केली जाते. यावेळी ही तिथी मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी आहे. या दिवसाला (worshipped)धार्मिकरित्या खूप महत्त्व आहे. या दिवशी होमहवन आणि कन्या पूजन देखील केले जाते. ही तिथी शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजे दुर्गा अष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते.

यंदा नवरात्र 9 ऐवजी 10 दिवस चालणार आहे. यावेळी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून झाली आहे आणि 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी नेमकी अष्टमी तिथी कधी आहे, पूजा करण्यासाठी काय मुहूर्त आहे, जाणून घ्या

अष्टमी तिथी आणि कन्या पूजनासाठी मुहूर्त

नवरात्रीमधील अष्टमी तिथी मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी महागौरीची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.37 ते 5.25 आहे, तर अभिजित मुहूर्त दुपारी 11:47 ते 12:35 वाजेपर्यंत आहे. यावेळी कन्या पूजनासाठी मुहूर्त सकाळी 10.40 ते दुपारी 12.10 पर्यंत आहे.

अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा कशी करायची

अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर चांगले कपडे परिधान करावे. त्यानंतर महागौरी देवीला गंगाजलाने अभिषेक करुन तिची स्थापना करावी. तसेच देवीला लाल चंदनाचा लेप, संपूर्ण धान्य, लाल फुले इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात. त्यासोबतच देवीला फळे, खीर आणि मिठाई या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. दिवा आणि अगरबत्ती लावून देवीची पूजा करावी. यानंतर हवन करा आणि सुपारीच्या पानावर कापूर ठेवून आरती करा. पूजेच्या शेवटी काही कमतरता असल्यास देवीची माफी मागावी.

कसे आहे देवीचे रुप

देवीचे हे रूप पूर्णपणे पांढरे आहे. अशी मान्यता आहे की, वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्येनंतर देवीला हा गोरा रंग प्राप्त झाला. या देवीने पांढरे रंगांचे वस्त्र परिधान केलेले आहे. ही देवी बैलावर स्वार आहे. तिला चार हात आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, महागौरी म्हणून अवतार घेताना देवी आठ वर्षांची होती, असे म्हटले जाते.

अष्टमी तिथीचे महत्त्व

पंचांगानुसार, आश्विन शुक्ल अष्टमी तिथीची सुरुवात सोमवार, 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4.31 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.6 वाजता होणार आहे. उदयतिथीनुसार अष्टमी तिथी मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कन्या पूजन केले जाते. त्यावेळी किमान 9 कुमारिका मुलींना आमंत्रित केले जाते. त्यांना तांदळाची खीर, हलवा, पुरी हे पदार्थ खायला देतात. आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करतात आणि त्यांना भेटवस्तू देतात. यावेळी कन्यापूजन 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर म्हणजे नवमीच्या दिवशी केले जाणार आहे.

हेही वाचा :

गरबा म्हणजे नक्की काय ? 
झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते?
आज नवरात्रीची महाअष्टमी राशींसाठी भाग्यशाली!