मोठी बातमी! राज्यात आजपासून मान्सूनपुर्व पावसाला सुरूवात

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कडाक्याचं ऊन पडलं होतं. (monsoon) काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशापेक्षा जास्त झालं होतं. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाने माणसं होरपळून निघत होती. त्यातच आता हवामान खात्याने दिलासा देणारी खुशखबर दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या बदलत्या हवामानाबद्दल मोठी माहिती दिली आहे. राज्यात आजपासून मान्सुन पुर्व पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या ७ मेपर्यंत अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. (monsoon)त्यामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडामुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कारण खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भाक ४ ते ७ मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे नागपूर आणि संपूर्ण विदर्भात येत्या २ ते ३ दिवसात हवामानात मोठा बदल होऊ शकतो.

‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या प्रभावामुळे मध्य भारतात या बदलाचा परिणाम दिसून येईल. (monsoon)तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडासंह गारपिटीचीही शक्यता आहे.

मराठवाड्यात ५ ते ७ मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकणात सध्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये ४१.८ अंश सेल्सियसवर पारा नोंदवण्यात आलायय तर चंद्रपूरमध्ये ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उकाडा कमी होईल अशी शक्यता आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?