इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ संघर्ष करताना दिसला आहे.(rest)पहिल्या ९ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स केवळ २ सामने जिंकू शकले आहेत, तर ७ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या ९ व्या क्रमांकावर आहे. तसेच त्यांचे आयपीएल २०२६ स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.सध्या केवळ गणिती समीकरणानुसार त्यांचे आव्हान जिवंत आहे. यातच मुंबईला सर्वाधिक चिंता सतावत आहे ते वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मची.

बुमराहला आयपीएल २०२६ स्पर्धेत फार काही खास करता आलेले नाही.(rest) त्याने केवळ ३ विकेट्स आत्तापर्यंत घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याची मागणी होत आहे. याबाबत आता मुंबईचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी चकीत करणारे विधान केले आहे.बुमराह २०२६ टी२० वर्ल्ड कपपासून सातत्याने खेळत आहे. तसेच मुंबईला त्याच्याकडून बचावात्मक गोलंदाजीसोबतच आक्रमक गोलंदाजीचीही अपेक्षा आहे. अशात बुमराह थकलेला असून विकेट्ससाठी झगडताना दिसत आहे.
आता अशा परिस्थितीत आता जवळपास आव्हान संपुष्टात आल्यानंतर मुंबई बुमराहला (rest)उर्वरित सामन्यांत विश्रांती देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना माहेला जयवर्धने म्हणाले, ‘आम्ही अजून स्पर्धेतून बाहेर पडलोय का?’मुंबई इंडियन्सला २ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर बोलताना जयवर्धने म्हणाले, ‘मी अशा काही गोष्टी बोलणे, हे खूप घाईचे ठरेल. आम्हाला अजूनही ५ सामने खेळायचे आहेत, आमच्यासाठी काहीही होऊ शकते. आम्हाला स्पर्धा सकारात्मकतेने संपवायची आहे आणि नंतर काय होतं ते पाहू.’
‘अद्याप खूप क्रिकेट खेळणे बाकी आहे. मला वाटत नाही की गणिती समीकरणानुसार अद्याप आम्ही स्पर्धेतून बाहेर झालो आहे, त्यामुळे मी लढत राहणार आहे आणि मला खात्री आहे की बाकी खेळाडूही तेच करतील.’दरम्यान, बुमराहने आयपीएल २०२६ स्पर्धेत जवळपास ३३ षटके गोलंदाजी केली असून ८.६० च्या इकोनॉमीने केवळ ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला या तिन्ही विकेट्स वेगवेगळ्या सामन्यांमध्ये मिळाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ सामन्यात बुमराहला विकेट मिळाली नव्हती. बुमराहसाठी यापूर्वी कधीही इतका खराब आयपीएल हंगाम राहिलेला नाही.
जयवर्धने पुढे म्हणाले, ‘केवळ बुमराहच नाही, तर बाकी गोलंदाजांबाबतही असंच आहे. जेव्हा सर्व मिळून प्रयत्न करतात, तेव्हा बुमराहलाही अधिक आक्रमक होऊन गोलंदाजी करण्याची संधी मिळते. कधीकधी हंगाम धीमा होतो, पण त्याचा दर्जा नेहमीच उच्च राहिल. त्याने आज चांगली गोलंदाजी केली, त्याला आणखी विकेट्स मिळू शकता. पण सध्याचा त्याच्यासाठी एक फेज असून त्याच्यासाठी हा दीर्घ हंगाम आहे. आपल्याला हे देखील पाहावे लागेल.’इंडियन्सला पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सोमवारी ४ मे खेळायचा आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?